Video by via Dailymotion
Source
पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब यांनी नुकतेच ‘बनारसी साज’ संकल्पनेवर आधरित भव्य असा आयसिंग केक तयार केला आहे. इटली येथील इंटरनॅशनल केक प्रोजेक्ट’साठी हा भव्य केक तयार करण्यात आला आहे. या प्रॉजेक्टसाठी जगभरातून केक कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात पुण्यातून प्राची यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कलाकारांना केकच्या माध्यमातून आपल्या देशाची संस्कृती सादर करण्यास सांगितले होते.